महाराष्ट्र
20-Jan-2026
कवडदरा विद्यालयात काॕपीमुक्त अभियान अंतर्गत शपथ
कवडदरा-
भारत सर्व सेवा संघ शैक्षणिक संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल व ज्यूनिअर काॕलेज कवडदरा (ता.इगतपुरी) विद्यालयात काॕपीमुक्त अभियान अंतर्गत जनजागृती कार्यक्रम अंतर्गत वाचन करुन शपथ घेण्यात आली.येत्या दहावी व बारावी बोर्ड परीक्षेत कोणत्याही प्रकारचे गैर वर्तन काॕपी करणार नसल्याबाबत या प्रतिज्ञा शपथ घेण्यात आली.यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
जर कोणी गैरमार्गाचा विचार करत असेल तर त्यास गैरमार्गापासून परावृत्त करेन. परीक्षेला सामोरे जाताना मंडळ सूचनांचे व नियमांचे काटेकोरपणे पालन करेन. मी सातत्याने अभ्यास करेन व प्रश्नपत्रिका सोडविण्याचा सराव करेन. तसेच परीक्षेस आत्मविश्वासाने, निर्भिडपणे, तणावविरहित सामोरे जाईन व चांगल्या गुणाने उत्तीर्ण होऊन माझ्या शाळेचे, आई वडीलांचे व गुरूजनांचे नाव उज्ज्वल करेन.
असे यावेळी शपथ घेताना विद्यार्थ्यांनी वाचन केले.यावेळी आर.एल.राठोड सर यांनी विद्यार्थ्यांना आर्डर देऊन शपथ वाचन डी.आर.चव्हाण यांनी केले.