महाराष्ट्र
22-Feb-2026
थाटे जिल्हा परिषद शाळेत आमदार मोनिकाताई राजळे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना साहित्य वाटप
शेवगाव तालुका प्रतिनिधी
शेवगाव तालुक्यातील थाटे जिल्हा परिषद शाळेततील इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य पेन, वही वाटप करून विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या खाऊ वाटप करण्यात आला. याप्रसंगी भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष सुधीर भाऊ जायभाये यांच्यासह शालेय समितीचे अध्यक्ष विष्णू शिरसाठ , दादासाहेब सातपुते, अशोक केदार, पांडुरंग शिरसाठ, म्हातारदेव केदार, बाळू केदार, ज्ञानेश्वर केदार, सोना जगदाळे, शाळेचे मुख्याध्यापक हरिश्चंद्र बडे , शिक्षिका डमाळे मॅडम, मनीषा ताई सातपुते व ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते