महाराष्ट्र
04-Feb-2026
नवजीवन स्कूलचा कराटे स्पर्धेत घवघवीत यश
सिन्नर तालुका -
नासिक जिल्हा विभागीय क्रीडा संकुल नासिक ने आयोजित केलेल्या 7 व्या आझाद कप कराटे स्पर्धा या स्पर्धेमध्ये नवजीवन डे स्कूल सिन्नर च्या विद्यार्थ्यांनी काता व कुमिते या कराटे स्पर्धेत यश संपादन करून 07 गोल्ड ,06 सिल्वर, आणि 19 ब्रांच एकूण 32 पदके मिळवली आणि सर्वात बेस्ट टीम ट्रॉफी मिळवली या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणारे कराटे शिक्षक श्री अमर बैरागी सर यांचे संस्थेचे मॅनेजिंग ट्रस्टी श्री सुभाष देशमुख (बडे सर )चेअरमन सौ विजयाताई देशमुख (बडे मॅडम) संस्थेच्या संचालिका शिरीन देशमुख (दीदी )यांनी भरभरून कौतुक केले व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले .काता व कुमिते कराटे या स्पर्धेमध्ये एकूण 13 विद्यार्थी सहभागी झाले होते 1)संचिता शिंदे -प्रथम, तृतीय .2)समृद्धी साळकर -द्वितीय, तृतीय 3)तेजस्विनी पर्वत -प्रथम ,प्रथम 4)संस्कृती सोनवणे- तृतीय , तृतीय 5)इंसिका नायडू -तृतीय ,द्वितीय 6)सोहम लाड -प्रथम, द्वितीय 7)स्पर्श पंटेवार -द्वितीय, प्रथम 8)नसीम अन्सारी- तृतीय ,तृतीय 9)आदर्श वानखेडे -प्रथम ,द्वितीय 10)सम्राट- तृतीय ,प्रथम 11)श्रेयश भोर -द्वितीय ,तृतीय 12)रुद्र पवार- तृतीय, प्रथम 13)आरुष जाधव- प्रथम ,द्वितीय या यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे शिक्षण अधिकारी श्री बी .बी. पाटील शाळेच्या प्राचार्य सौ अनिता सूर्यवंशी व क्रीडा विभाग प्रमुख श्री प्रल्हाद देशमुख सर यांनी क्रीडा शिक्षक श्री अमर बैरागी सर नेहमीच सहभागी होत असलेला प्रत्येक स्पर्धेत यश मिळवतात असे म्हणत त्यांचे कौतुक व अभिनंदन केले माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ सविता फड ,प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ प्रीती गुजराथी,केजी विभाग प्रमुख सौ सुमन बिचवे , श्री नरेंद्र वाघ, सौ योगिता भाटजीरे, श्री शरद शिंदे ,श्री निलेश भावसार, सौ निशा भागवत, सौ सोनाली गीते ,सौ स्मिता लुटे ,समीक्षा शेलार, तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शन करणाऱ्या श्री अमर बैरागी सर यांचे अभिनंदन व कौतुक केले