25-Feb-2026
कवडदरा विद्यालयाच्या "एमएमएनएस" परीक्षेमध्ये यश, ४ विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड
कवडदरा- इगतपुरी तालुक्यातील कवडदरा येथील
भारत सर्व सेवा संघ पाचेगाव संचलित या शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज कवडदरा विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यश मिळवत शिरपेचा मानाचा आणखी एक तुरा विद्यार्थ्यांनी चढवला आहे. कु. खाडे प्रियंका,करण रोंगटे, सुयश कुंदे, नितीन डगळे या चार विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषद पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या "एमएमएनएस" (MMNS)राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी
या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाल्याबद्दल विद्यालयाचे प्राचार्य-मुख्याध्यापक/ प्राचार्य बी.एस पवार यांनी माहीती दिली.विद्यालयात यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार सन्मान फुल पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला.यावेळी विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षिका सौ.एस.के.भोईर,श्री.एस.एस.लोहार यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार केला.तसेच विद्यार्थ्यांना एमएमएनएस शिष्यवृत्ती परीक्षेसाठी मार्गदर्शन करणारे शिक्षक पी.ई.परदेशी यांचा सन्मान ज्येष्ठ शिक्षक श्री.आर.एल.राठोड सर यांनी केला.
विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे. तसेच पंचक्रोशीतील आजी-माजी विद्यार्थी, ग्रामस्थ व भारत सर्व सेवा संघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.श्री. राजेंद्र नलगे,सचिव मा.श्री. प्रकाश जाधव
व सर्व संचालक मंडळ पदाधिकारी,मुख्याध्यापक- प्राचार्य बी.एस.पवार
शालेय व्यवस्थापन समिती सदस्य मंडळ,माता पालक संघ,शालेय सुरक्षा समिती,शालेय विद्यार्थी यांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.या विद्यार्थी सत्कार सन्मान प्रसंगी पञकार अमोल म्हस्के,जी.जे.जाधव,डी.व्ही.चव्हाण,व्हि.आर.भांगे
व्ही.व्ही.गजघाट,डी.आर.चव्हाण,एस.डी.जाधव,शरद झनकर,भोगीर सर,शिक्षिका सौ.के.ए.मुल्ला,सौ.भालेराव मॕडम
शिक्षकेतर कर्मचारी किरण कासार,पी.बी.खेडकर तसेच विद्यार्थी उपस्थित होते.