महाराष्ट्र
08-Jan-2026
समूहगीत गायन स्पर्धेत शिक्षक कॉलनी शाळेचा तालुक्यात प्रथम क्रमांक
पाथर्डी प्रतिनिधी:
सप्टेंबरमध्ये नव्याने हजर झालेले मुख्याध्यापक श्री. बाबासाहेब जायभाये, श्रीम. संगीता बुधवंत यांनी विविध उपक्रम राबवून पालकांचे लक्ष वेधून घेतले.ग्रामस्थांनी एक लाखापेक्षा जास्त रुपयाच्या वस्तू रूपाने मदत केली. केंद्र पातळीवर गायनातील दोन क्रमांक आले होते. त्यापैकी वैयक्तिक व समूहगीत गायन या दोन प्रकारात तालुका स्पर्धेत सहभाग घेतला होता.
वैयक्तिक मध्ये प्रिन्सी अजय गुप्ता हिने 'राधे तुला पुसतो घोंगडीवाला' हीं गौळण सादर केली. तिच्या गायनाचं उपस्थितानी तोंडभरून कौतुक केले. समूहगीत गायनात लहान गटात तालुक्यात प्रथम क्रमांक आला त्याबद्दल गटशिक्षणाधिकारी शिवाजी कराड, विस्ताराधिकारी रामनाथ कराड, अनिल भवार, केंद्रप्रमुख दगडू महांडुळे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अंबादास चव्हाण,आकाश वारे ग्रामपंचायत सदस्य, किशोर चव्हाण उपसरपंच, सुनिता जाधव ग्रामपंचायत सदस्य, प्रमोद भावसार, भारत नन्नवरे, अशोक तुपे, पांडुरंग वारे, सनी गायकवाड, विकास बावणे, संदीप खोटे, अजय गुप्ता, अरविंद शिरसाट, सोनाली उपाध्ये, सोनाली बावणे, कोमल राठोड, सुरेखा पवार, माधुरी टिपरे, मनिषा चव्हाण,गंगू चव्हाण,अश्विनी काळोखे, मीराताई मोहिते आदींनी मुलांचे कौतुक करून पुढील स्पर्धेस शुभेच्छा दिल्या.