महाराष्ट्र
9660
10
पिकांसोबत बळीराजाही कोलमडला
By Admin
अवकाळीने 22 हजार हेक्टर शेतीचा घास घेतला, उभ्या पिकांसोबत बळीराजाही कोलमडला
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्यातील 21 जिल्ह्यांतील तब्बल 22 हजार 233 हेक्टरवरील उभ्या पिकांचे अतोनात नुकसान झाल्याची प्राथमिक आकडेवारी आहे. साधारणपणे 1 मेपासून सुरू झालेला अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीमुळे केळी, आंबा, मका, संत्रा, धान, भाजीपाला, फळपिकांचे कोटय़वधी रुपयांचे नुकसान झाले आहे.
सध्या पंचनामे सुरू आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात आकडा वाढण्याची शक्यता आहे; पण अस्मानी सुलतानीमुळे उभी पिके आणि बळीराजाही कोलमडून पडला आहे.
राज्यात ठाणे जिल्ह्यापासून पालघर, रायगड, ठाणे, नाशिक, धुळे, नंदुरबार, अहिल्यानगर, पुणे, जळगाव, जालना, परभणी, बुलढाणा, अमरावती, यवतमाळ, वाशीम, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या 21 जिल्ह्यांमध्ये साधारणपणे 1 मेपासून अवेळी पावसाला सुरुवात झाली. सोबत वादळी वारे, व गारपिटीमुळे प्रचंड नुकसान झाले आहे.
कोणत्या पिकांचे नुकसान झाले
केळी, जांभूळ, आंबा, भात, चिकू, बाजरी, मका, डाळिंब, कांदा, भाजीपाला, पपई, मूग, उडीद, ज्वारी, भुईमूग, संत्रा, धान, फळपिके.
चंद्रपूर जिल्ह्यात 1 हजार 38 हेक्टरवरील शेतीचे नुकसान यासंदर्भात अधिक माहिती देताना राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील म्हणाले की, नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेती पीक नुकसानीपोटी 2023-24 मध्ये 54 लाख 80 हजार शेतकऱ्यांना 4 हजार 833 कोटी रुपये दिले होते. तर एप्रिल 24 ते 31 मार्च 25 या काळात 69 लाख 4 हजार शेतकऱ्यांना 9 हजार 989 कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे.
कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान
– अमरावती जिल्ह्यातील अचलपूर, भातकुली, चांदूर बाजार, चिखलदरा तालुक्यातील तब्बल 10 हजार 636 हेक्टरवरील उभ्या पिकांचे नुकसान.
– जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, जामनेर, रावेर, भडगाव, एरंडोल, मुक्ताईनगर, धरणगाव, बोदवड, पारोळा, अमळनेर तालुक्यातील 4 हजार 396 हेक्टरवरील पिकांचे नुकसान.
– जालना जिल्ह्यातील अंबड, मंठा, बदनापूर, परतूर, जालना तालुक्यात 1 हजार 695 हेक्टर पिकांचे नुकसान.
– नाशिक जिल्ह्यातील सिन्नर, निफाड, बागलाण, त्रंबकेश्वर, सुरगाना, मालेगाव, दिंडोरी तालुक्यात 1 हजार 734 हेक्टरवर नुकसान.
नाशिक जिल्ह्यातील सिन्नर, निफाड, बागलाण, त्रंबकेश्वर, सुरगाना, मालेगाव, दिंडोरी तालुक्यात 1 हजार 734 हेक्टरवर नुकसान.
– पालघर जिल्ह्यातील पालघर, तलासरी, डहाणू, वाडा, विक्रमगड, वसई तालुक्यातील 796 हेक्टरवरील पिकांचे नुकसान.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. पंचनामे करण्यासाठी महसूल व कृषी विभागाची पथके स्थापन केली आहेत. – मकरंद पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री
Tags :

