तिसगाव-अमरापूर रस्ता चिखलमय झाल्याने अपघातात एकाचा मृत्यू तर बत्तीस जण जखमी
रस्ता खोल खोदून ठेवला तेथे दिशादर्शक बॕरेट व माहीती
किंवा चिन्ह द्यावीत
ऐन पाऊसाळ्यात रस्त्याच्या कामाला सुरवात; प्रशासनाची कामात दिरगांई
पाथर्डी तालुका- पाथर्डी तालुक्यातील कासार पिंपळगाव-चितळी-पाडळी- तीसगाव ते अमरापूर रस्त्याचे काम सुरु असून पाऊसळ्यात कामाला सुरवात झाली आहे.रस्त्याने लोकांना जीव मुठीत धरुन चालावे लागत आहे.गाडीवर चालताना चालकासह लहान मुले,महीला,वयस्कर व्यक्तीना घसरुन जीव आपला जातो की काय असे वाटत आहे.
रस्त्यावर शेतातील लाल-काळी माती टाकल्याने रस्त्यावर चिखल झाला आहे.रस्त्याचे काम करताना पुर्ण रस्ता उखडून ठेवला आहे.रस्ता गायब झाला असे वाटते. प्रशासनाने कामात दिरगांई केल्याने आजही रीमझिम पाऊसामुळे रस्ता चिखलमय झाल्याने दोन चाकी गाड्या घसरल्याने गाडी चालक अशा पाच-सहा घडल्या तसेच गेल्या चार दिवसापासुन दहा-पंधरा घटना घडल्या यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून काही जखमी झाले आहेत.
रस्त्याचे काम अतिशय संथ गतीने चालू असल्याने या घटना होत आहेत.अनेक ठिकाणी रस्ता खोदून ठेवला आहे. ज्या ठिकाणी रस्ता खोल खोदून ठेवला आहे.तेथे दिशादर्शक बॕरेट व माहीती
किंवा चिन्ह द्यावीत.अशी माहीती वाहन चालकाकडून होत आहे.
राञीच्या वेळी खोल खोदून ठेवलेला रस्ता न समजल्याने अपघात घडत आहे.
वाहन चालक नागरीकांची काळजी घेण्यासाठी तातडीने योग्य ती तातडीने अंमलबजावणी प्रशासन व संबंधित ठेकेदार यांनी दिलेल्या वेळेत रस्त्याचे काम पुर्ण करावे.
ज्या ठिकाणी रस्ता खोल खोदून ठेवला आहे.तेथे दिशादर्शक बॕरेट व माहीती
किंवा चिन्ह द्यावीत.अशी माहीती वाहन चालकाकडून होत आहे.अशी नागरीकाकडून होत आहे.