कवडदरा विद्यालयाचा दहावीचा ९४ टक्के निकाल
बारावीचा विज्ञान शाखा९८.३८,कला शाखा९३.२० टक्के निकाल
कवडदरा- इगतपुरी तालुक्यातील कवडदरा येथील भारत सर्व सेवा शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल व ज्यूनिअर काॕलेज कवडदरा विद्यालयाचा शेकडा निकाल ९४ टक्के लागला असुन
प्रथम क्रमांक - वैष्णवी बाळू फोकणे ९२ टक्के, व्दितीय क्रमांक - शितल कैलास फोकणे ८९.८० टक्के,तृतीय क्रमांक- पद्मेरे रोहन पंडित ८९.२०%, साक्षी संतोष शिंगोटे- ८८.४० टक्के, गायत्री समाधान सकभोर ८८ टक्के मिळवून यश मिळवले आहे.तसेच
इयत्ता बारावीचा एच एस सी निकाल पुढीलप्रमाणे- विज्ञान शाखा निकाल ९८.३८ टक्के लागला असून प्रथम क्रमांक- जाधव चेतना संजय ७४.१७ टक्के, व्दितीय क्रमांक- शिंदे प्रियंका बाळासाहेब ७१.८३ टक्के,तृतीय क्रमांक - झनकार अनुष्का भरत ७०.८३ टक्के व कला शाखेचा निकाल ९३.२० लागला आहे.प्रथम क्रमांक- घाडगे सानिका रामदास ८१.६७ टक्के,व्दितीय क्रमांक- आवारी अपेक्षा भगवान 73.33टक्के,तृतीय क्रमांक- निसरड योगेश ज्ञानेश्वर ६९.६७ टक्के गुण मिळाले आहेत.
यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक सहकारी शिक्षक यांचे भारत सर्व सेवा संघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र नलगे, सचिव प्रकाश जाधव तसेच सर्व संस्था संचालक सदस्य मंडळ व विद्यालयाचे प्राचार्य /मुख्याध्यापक व्ही.एम.कांबळे तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी,पालक,ग्रामस्थ ,माजी विद्यार्थी,माजी शिक्षक यांनी यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.