महाराष्ट्र
36355
10
अभय प्रभावना हे मानवी विचारांना प्रभावित करणारे संग्रहालय
By Admin
अभय प्रभावना हे मानवी विचारांना प्रभावित करणारे संग्रहालय-प्राचार्य अशोक दौंड
डॉ. अभयकुमार फिरोदियांचे पुणे येथे १६० एकर अभय प्रभावना संग्रहालय
श्री तिलोक जैन संस्थेचे सचिव सतिश गुगळेंच्या संकल्पनेतून ५० शिक्षकांचा अभ्यास दौरा
पाथर्डी प्रतिनिधी:
श्री तिलोक जैन ज्ञान प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा प्रसिद्ध उद्योगपती डॉ.अभयकुमार फिरोदिया यांच्या एक दशकाच्या मेहनतीतून व संकल्पनेतून पुणे स्थित इंद्रायणी नदीच्या किनारी १६० एकर परिसरात अभय प्रभावना संग्रहालयाची निर्मिती करण्यात आलेली आहे. या संग्रहालयाच्या निर्मितीचे उद्दिष्ट हे आहे की, जैन धर्म केवळ त्याग व अहिंसेबाबत नसून करुणा,आत्मउत्थान च्या माध्यमातून समाजातील प्रत्येक व्यक्तीसाठी आनंदाची अनुभूती प्राप्त करून देणे व उत्पादकतेच्या माध्यमातून समाजाला समृद्ध बनवणे या साठी तत्पर आहे. त्या अनुषंगाने अभय प्रभावना संग्रहालय आजच्या धकधकीच्या जीवनात जैन धर्मातील मूल्य व त्याचे महत्त्व विशद करण्याच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त आहे. त्यामुळे अभय प्रभावना ही प्रत्येकाने घेण्यासारखी अनुभूती आहे,असे प्रतिपादन श्री तिलोक जैन विद्यालयाचे प्राचार्य अशोक दौंड यांनी केले.
विद्यालयातील शिक्षकांचा या बाबतीत सविस्तर व चिकित्सक अभ्यास व्हावा, या दृष्टिकोनातून श्री तिलोक जैन ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव सतिश गुगळे यांच्या संकल्पनेतून विद्यालयातील ५० शिक्षकांचा अभ्यास दौरा अभय प्रभावना पूणे या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता. त्यावेळी बोलतांना त्यांनी वरील विचार व्यक्त केले.
यावेळी उपस्थित शिक्षकांनी सकाळी दहा ते सायंकाळी पाच या कालावधीत संग्रहालयास भेट दिली व तेथील सर्व बाबी सविस्तरपणे जाणून घेतल्या. अभय प्रभावना संग्रहालय हे पाच भागांमध्ये विभागलेले असून कालातीत ज्ञान - तत्त्वज्ञान, मूल्य व अध्यात्म, संस्कृती व इतिहासाची उत्क्रांती, शांतचित्र - आनंदाचा मार्ग,भारतीय मूल्यांचा शाश्वत प्रवाह व ओपन हेरिटेज.या शिवाय जैन दर्शन व तत्व मिमांसा, जैन परंपरेचा ऐतिहासिक विकास म्हणजे समाज,संस्कृती, साहित्य,वास्तुकला, वर्तमान काळातील जैन मूल्यांची प्रासंगिकता व त्याचे जीवनातील महत्त्व,भारतीय परंपरेतील संत व आचार्य यांचे महत्त्व या बाबत शिक्षकांनी सविस्तर माहिती जाणून घेतली. या शिवाय संग्रहालयाच्या केंद्रभागी असणारा मानस्तंभ भारताचे समृद्ध सामाजिक तसेच व्यक्तिगत मूल्य यांचे महत्त्व विशद करण्याच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त आहे.
यावेळी सर्व शिक्षकांनी मानस्तंभाला देखील भेट दिली. हे संग्रहालय अत्याधुनिक तंत्रज्ञान व भारताची प्राचीन परंपरा यांचा समतोल साधणारे व सद्यस्थितीमध्ये मानवी जीवनाला शांती,समाधानाची अनुभूती देणारे एक महत्त्वाचे स्थळ असल्याची भावना उपस्थित सर्व शिक्षकांनी बोलून दाखवली.
सदरचा दौरा यशस्वी वातावरणात संपन्न करून चिकित्सक अभ्यास केल्याबद्दल संस्थेच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी उपस्थित सर्व शिक्षकांचे मनापासून अभिनंदन केले आहे.
Tags :

