महाराष्ट्र
11-Jan-2026
टाकेद बुद्रुक विद्यालयाचा इलिमेंटरी व इंटरमिजिएट ग्रेड परिक्षेचा निकाल शंभर टक्के
इगतपुरी तालुक्यातील टाकेद बु. येथील
भारत सर्व सेवा संघ शिक्षण संस्थेच्या
न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज, टाकेद बुद्रुक विद्यालयाचा सन 2025 चा इलिमेंटरी व इंटरमिजिएट ग्रेड परिक्षेचा निकाल शंभर टक्के लागला असून इलेमेंटरीच्या 55 विद्यार्थ्यांपैकी 15 विद्यार्थी हे A ग्रेडने व 18 विद्यार्थी हे B ग्रेडने तर 22 विद्यार्थी हे C ग्रेड पात्र झाले आहे व इंटमिजिएटच्या 40 विद्यार्थ्यांपैकी 05 विद्यार्थी हे A ग्रेडने , 10 विद्यार्थी हे B ग्रेडने, 23 विद्यार्थी हे सी ग्रेडने व 2 विद्यार्थी गैरहजर प्रमाणे उत्तीर्ण झाले आहेत .सर्व विद्यार्थ्यांचे भारत सर्व सेवा संघ पाचेगाव संस्थेचे मा.अध्यक्ष साहेब, मा. उपाध्यक्ष साहेब, मा . सचिव साहेब , सर्व विश्वस्त ,पदाधिकारी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मा. श्री. युवराज घोरपडे, प्राचार्य मा श्री. पाटील एस. एच. सर,उपप्राचार्य श्री. म्हस्के ए.डी., पर्यवेक्षिका श्रीमती गायकवाड जे.बी. यांनी यशस्वी विद्यार्थीचे हार्दिक अभिनंदन केले. त्यांना मार्गदर्शन करणारे श्री. टाकसाळ एस.एम, व श्री. जावळे आर. एच. सर या कला शिक्षकांनी मार्गदर्शन केले.