महाराष्ट्र
15898
10
आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवून ध्येय निश्चित करावे- अभय आव्हाड
By Admin
आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवून ध्येय निश्चित करावे- अभय आव्हाड
श्री विवेकानंद विद्यामंदिर शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा
पाथर्डी प्रतिनिधी:
प्रत्येक विद्यार्थ्याचे शालेय जीवन अतिशय महत्त्वाचे मानले जाते.या शालेय जीवनातील इयत्ता दहावी नंतरचा टप्पा अतिशय महत्त्वाचा आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांनी स्वामी विवेकानंदांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपले जीवन आदर्शमय बनवावे तसेच पालकांनी आपल्या पाल्यांकडे सातत्याने लक्ष ठेवावे.शालेय जीवनात प्रत्येक विद्यार्थ्यांनी ध्येयवादी व प्रयत्नवादी राहून आई- वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवावी व पुढील ध्येय साध्य करावे असे प्रतिपादन पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अभय आव्हाड यांनी केले.
पार्थ विद्या प्रसारक मंडळ संचलित श्री विवेकानंद विद्यामंदिर पाथर्डी या शाळेतील एस.एस.सी. बोर्ड परीक्षा मार्च २०२५ मधील गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ नुकताच मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष अभय आव्हाड अध्यक्षस्थानी होते.
विद्यालयातील चि. सुमित अशोक काळे या विद्यार्थ्याने ९७.६० गुण प्राप्त करून पाथर्डी शहरात व विद्यालयात प्रथम येण्याचा मान प्राप्त केला. चि.फुंदे ईश्वर आदिनाथ ९६.२० गुण द्वितीय तर कु.कासार सानवी रवींद्र ९४.८० गुण प्राप्त करून तिसरा क्रमांक पटकाविला. विद्यालयातील २३२ विद्यार्थ्यांपैकी २३० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून विद्यालयाचा निकाल ९९.१३ टक्के लागला आहे. १८ विद्यार्थ्यांनी ९० पेक्षा जास्त गुण प्राप्त केले. यावेळी ८५ किंवा त्यापेक्षा अधिक गुण प्राप्त करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना गौरवचिन्ह, फेटा बांधून व पेढा भरुन गौरव करण्यात आला.यावेळी इयत्ता दहावी सर्व विषय शिक्षकांचा संस्थेच्या व पालकांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष अभय आव्हाड,मुख्याध्यापक शरद मेढे , समन्वयक ज्ञानेश्वर गायके, महेंद्र तांदळे, नंदकुमार झेंड व सर्व पालक बंधू- भगिनी तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्ञानेश्वर गायके, सूत्रसंचालन रेश्मा सातपुते तर आभार अर्चना दराडे यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी अभिजीत सरोदे, सतीश डोळे, संदीप धायतडक,स्नेहल बोराडे,विठ्ठल धस, तुषार शिंदे, राधा आव्हाड, प्रमोद हंडाळ ,शशांक महाजन,दीपक राठोड, सतीश बोरूडे,बाळू हंडाळ, आजिनाथ शिरसाट, कैलास भोसले यांनी परिश्रम घेतले.
Tags :

