महाराष्ट्र
22-Jan-2026
श्री तिलोक जैन विद्यालयाचे नृत्यमल्हार स्पर्धेत नेत्रदीपक सादरीकरण
पाथर्डी प्रतिनिधी:
अण्णाभाऊ साठे रंगमंदिर, येरवडा, पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या नृत्यमल्हार या राज्यस्तरीय शास्त्रीय कथ्यकनृत्य प्रकारात श्री तिलोक जैन ज्ञान प्रसारक मंडळ संचलित श्री तिलोक जैन विद्यालयातील विद्यार्थिनींनी उत्कृष्ट सादरीकरण करत शाळेचे नाव उज्ज्वल केले.
ग्रामीण भागातून शास्त्रीय नृत्याचे धडे गिरवून व सदर प्रकार आत्मसात करून त्याचे राज्याच्या व्यासपीठावर सादरीकरण करणे ही बाब अत्यंत गौरवास्पद आहे.
या स्पर्धेत अमृता अरुण पानसंबळ, श्रावणी गोरक्ष जायभाये,तेजम रामेश्वर लोटके, अक्षदा सुरेश पवार, ऋतुजा संतोष पवार, रेणुका भगवंत कदम, ईश्वरी सचिन मरकड, राधिका देविदास कोकाटे, पल्लवी संजय चव्हाण, अथश्री संतोष घोगरे, कायरा संदिप चव्हाण या विद्यार्थिनींनी कथ्थक नृत्याच्या सादरीकरणातून कलात्मकता, लयबद्धता व भावपूर्ण अभिनय सादर करत परीक्षक व प्रेक्षकांची भरभरून दाद मिळवली.
ग्रामीण भागामध्ये शास्त्रीय नृत्य हा प्रकार जवळपास अस्तित्वात नसताना अशा प्रकारची कला शिकणे व राज्यस्तरावर त्याचे सादरीकरण करणे ही बाब संस्थेच्या दृष्टीने अतिशय अभिमानास्पद असल्याची भावना संस्थेचे सचिव सतीश गुगळे यांनी व्यक्त केली. या यशाबद्दल संस्थेचे उपाध्यक्ष चंपालाल गांधी, सचिव सतिश गुगळे, कोषाध्यक्ष सुरेश कुचेरिया, विश्वस्त डॉ. ललित गुगळे, राजेंद्र मुथ्था, धरमचंद गुगळे या सह कार्यकारी व सल्लागार मंडळाचे सदस्य यांनी विद्यार्थिनींचे विशेष कौतुक केले.
प्राचार्य अजय भंडारी, उपमुख्याध्यापक अशोक गर्जे, पर्यवेक्षिका मनिषा मिसाळ व पर्यवेक्षक भारत गाडेकर (शाहीर), सुधाकर सातपुते यांनी विद्यार्थिनींना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.